आयुष्मान भारत योजना
आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आरोग्य योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे, विशेषतः जे उपचार घेऊ शकत नाहीत अशा गंभीर आजारांसाठी रुग्णालयीन उपचाराचा खर्च सरकारकडून उचलला जातो.
लाभार्थी कोण ?
- ग्रामीण भागातील गरीब व वंचित कुटुंबे (SECC 2011 नुसार)
- शहरी भागातील कामगार वर्ग, असंघटित क्षेत्रातील नागरिक
- लाभ घेण्यासाठी कोणतीही नोंदणी फी किंवा प्रीमियम आवश्यक नाही
- महाराष्ट्रात ही योजना “महात्मा फुले जन आरोग्य योजना” सोबत एकत्रितपणे राबवली जाते
- ₹5 लाख पर्यंतचा आरोग्य विमा दरवर्षी कुटुंबासाठी
- 1300+ पेक्षा जास्त उपचार पॅकेजेस (शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, डायलिसिस, इ.)
- उपचारासाठी रुग्णालयात भरतीपूर्वी 3 दिवस आणि डिस्चार्जनंतर 15 दिवसांपर्यंतचा खर्च समाविष्ट
- औषधे, तपासण्या आणि निवास यांचाही समावेश
- नजीकच्या आयुष्मान भारत सुविधा केंद्रात (CSC / जनसेवा केंद्र) भेट द्या
- आपले नाव यादीत आहे का ते तपासा (https://pmjay.gov.in वरून)
- कागदपत्रांसह AB-PMJAY कार्ड तयार करून घ्या
- रुग्णालयात दाखल होताना हे कार्ड दाखवून कॅशलेस उपचार घ्या/li>
- आधार कार्ड
- रेशन कार्ड किंवा SECC यादीतील नाव
- आयुष्मान भारत कार्ड (ABHA ID – Health ID)
- लाभार्थ्याच्या नावासहित मोबाईल क्रमांक
- राष्ट्रीय हेल्पलाइन: 14555 / 1800-111-565
- वेबसाइट: https://pmjay.gov.in
- महाराष्ट्रासाठी: https://www.jeevandayee.gov.in